“गुवाहाटीला जाण्यासाठी बच्चू कडूंनी पैसे घेतले” ; रवी राणा यांचा गंभीर आरोप…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- अमरावतीमध्ये पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा विरुद्ध प्रहार संघटनेचे आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यामध्ये वाक्ययुद्ध रंगले आहे.
‘महाठग खिसे कापणारे आणि नंतर किराणा वाटत फिरणारे अशी राणा दाम्पत्याची ओळख आहे, अशी घणाघाती टीका बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी राणा दाम्पत्यावर केली होती. बच्चू कडूंच्या या टीकेला रवी राणा (Ravi Rana) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाण्यासाठी पैसे घेतले असल्याचा आरोप देखील रवी राणा यांनी केला आहे. रवी राणा म्हणाले, गुवाहाटीला जाणाऱ्या बच्चू कडूने आरोप करताना दहा वेळा विचार करावा.
विधानसभा आली तर त्यांना दमडी पाहीजे, राज्यसभा आली तर त्यांनी दमडी पाहीजे. कुण्या सरकारला पाठिंबा द्यायचा तर दमडी पाहीजे. गुवाहाटीला जायचं आहे तर दमडी पाहीजे. बच्चू कडू यांचे जीवन पैसा आहे.
असं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले आहेत. पुढे ते म्हणाले, मला असं वाटते बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. याला कुठल्याही प्रकारची मान मर्यादा नाही. बच्चू कडू जे आंदोलन करतो ते फक्त तोडीसाठी करतो.
तोडीबाज म्हणून त्याची ओळख असल्याचं म्हणत रवी राणा यांनी बच्चू कडू यांना टोला लगावलाय. माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मला सांगायचे आहे. रवी राणामध्ये धमक आहे. रवी राणा किराणा वाटतो, गरीबांवर उपचार करुन देतो.
मुलांना शिक्षणासाठी मदत करतो. आदिवासी कुटुंबाना रवी राणा स्वत:चा पगार देतो, असंही ते म्हणाले. काय म्हणालेत बच्चू कडू? अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात शिंदे गटाचे आमदार व माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली होती. या कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांनी राणा दाम्पत्यावर जहरी टीका केली.
गोरगरीबांचे खिशे कापायचे, त्यांच्या खिशात हात घालायचा. लोकशाहीचं पतन करायचं. राजकारणाची ऐशी की तैशी करायची,असे नेते आपल्यात कमी नाहीत. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार दिला, त्या अधिकाराचं पतन करत आम्ही पुन्हा किराण्यावर निवडून येतो, असं सांगणाऱ्या महाठगाला सुद्धा आपण पाहतोय, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….