केदारनाथ येथे हेलिकॉप्टर दुर्घटनेत महाराष्ट्रातील पायलटसह सात जण सहभागी होते ; सात जणांचा मृत्यू…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
केदारनाथ :- उत्तराखंडमध्ये केदारनाथ धामनजीक हेलिकॉप्टर कोसळून भयंकर अपघात झाला. यात सहा यात्रेकरूंसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आर्यन कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. सहा यात्रेकरूंना घेऊन केदारनाथ हेलिपॅड येथे लँड होणार होते. मात्र, ढगाळ वातावरण आणि दाट धुके यामुळे पायलटचे नियंत्रण सुटले आणि हेलिकॉप्टर गरुडचट्टी येथे कोसळले.
कोसळल्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. गरुडचट्टी हे ठिकाण केदारनाथ धामपासून दोन किलोमीटर आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटली असून, पूर्वा रामानुज (26), किर्ती बरार (30) आणि उर्वी बरार (25) हे तिघे गुजरातचे तर सुजाता (56), प्रेम कुमार आणि काला (60) हे तिघेजण तामीळनाडूचे आहेत. पायलट अनिल सिंह (57) हे महाराष्ट्रातील होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….