राज्यातील या दोन खासदारांचे तडकाफडकी राजीनामे, नेमकं काय आहे प्रकरण….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राजीनामा दिला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष आहेत, तर ओमराजे निंबाळकर या समितीचे सदस्य आहेत.
या दोघांच्या तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यांची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. कोरोनानंतर रेल्वे थांबे पूर्ववत करावे आणि इतर मागण्या खासदार मंडळींनी केल्या असता रेल्वे अधिकारी यांचा मनमानीपणे कारभार सुरू आहे. या मनमानीला कंटाळून खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोलापूर विभागीय रेल्वे मंडळाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. या मंडळात ३६ खासदार सदस्य आहेत.
रेल्वे समितीच्या बैठकीत आज प्रशासन आणि समितीची सदस्य असलेले खासदार यांच्यामध्ये मोठा वाद झाला. त्यामध्ये अध्यक्षांसह इतर खासदारांनीही आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुण्यात झालेल्या रेल्वे विभागाच्या बैठकीत वाद झाल्यानंतर रेल्वे विभागीय समितीचे अध्यक्ष खासदार रणजित निंबाळकर यांच्यासह सदस्य असणाऱ्या खासदारांनी राजीनामे दिल्याने खळबळ उडाली आहे. पुणे येथे सेन्ट्रल रेल्वेच्या विभागीय समिती पदाच्या अध्यक्ष पदाचा भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राजीनामा दिला आहे.
तसेच आजची बैठक रद्द झाली आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी समितीचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यानंतर आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. खासदारांची काय मागणी – कोरोनापूर्वी ज्या स्थानकावरती रेल्वे थांबा होता, असे सर्व पूर्वरत करावे.
थांबा मिळावा, लोकांची गैरसोय थांबावी, विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी यांचे प्रश्न सुटावेत, भुयारी मार्ग, आणि दोन गावांना जोडणारे रस्ते जे रेल्वे अधिकार क्षेत्रात येतात ते दुरुस्त करावेत, कुर्डूवाडी रेल्वे डब्याचा कारखाना चालू रहावा, अशा मागण्या खासदारांनी केल्या होत्या. तसेच स्टेशन सुविधा आणि सुधारणा, किसान रेल यासाठी वारंवार रेल्वे अधिकाऱ्यांना सांगूनही हे प्रश्न सुटत नसल्याने या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि रेल्वे बाबू यांच्यात जोरदार घमासान झाले.
खासदार रणजितसिंह निंबाळकर काय म्हणाले – वारंवार मागणी करूनही रेल्वे बोर्ड सदस्य असणाऱ्या खासदारांच्या मागणीला किंमत देत नसल्याने या रेल्वे मंडळाचा अध्यक्ष म्हणून राजीनामा देत आहोत, असे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी सांगितलं. तसेच यापुढे रेल्वे मंडळाच्या कोणत्याही बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले आहे.
आज DRM पुणे कार्यालय येथे आयोजित रेल्वे समितीच्या बैठकीत रेल्वे विभागीय मंडळाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रेल्वेच्या प्रश्नासंदर्भात काही मागण्या केल्या. बैठकीला कोण-कोण उपस्थित – या बैठकीला विभागीय अध्यक्ष असणारे खासदार रणजित निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. या बैठकीस खा. ओमराजे निंबाळकर , खा.जयसिद्धेश्वर स्वामी, खा. उमेश जाधव, खा. श्रीरंग बारणे, खा. श्रीनिवास पाटील, खा. धैर्यशील माने, खा. हेमंत पाटील, खा. धनंजय महाडिक आणि रेल्वे GM लाहोटी, DRM रेणू शर्मा तथा निलेश ढोरे उपस्थित होते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….