कृषी अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन ; आमदार संतोष बांगर यांच्या अर्वाच्य भाषेचा निषेध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे यांना स्थानिक आमदार संतोष बांगर यांनी १३ ऑक्टोबर रोजी मोठ्या जनसमुदायासमोर अर्वाच्य भाषेमध्ये बोलून अपमान करून त्यांना मारहाणीची धमकी दिली होती.
या घटनेचा निषेध म्हणून राज्यभरात कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज १७ ऑक्टोबर, सोमवारी कामबंद आंदोलन केले. पुण्यात कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी कृषी आयुक्त धीरजकुमार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध केला.
पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत अतिवृष्टी, पावसातील खंड, कीड व रोगांचा प्रादुर्भाव , ढगफुटी, पूर, सततचा पाऊस अशा विविध आपत्तींमुळे चिंताग्रस्त शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मदत करण्यासाठी कृषी विभाग सातत्याने विमा कंपन्यांबरोबर पाठपुरावा करत आहे, शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी मेहनत घेत आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींकडून मिळत असलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे खात्यातील अधिकारी- कर्मचारी यांचे मनोबल खचले आहे. या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील सर्व कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी सोमवारी कामबंद आंदोलन करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….