पक्षातल्या संघर्षाचा फटका ; मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच शिवभोजन थाळीची उपेक्षा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेतल्या संघर्षामध्ये गोरगरीबांना दिलासा देणाऱ्या शिवभोजन थाळीची मात्र उपेक्षा होताना दिसत आहे. शिवभोजन थाळी बंद केली जाणार नाही, असं आश्वासन मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
त्याप्रमाणे ती बंद नाही झाली पण अनुदान मात्र थकवण्यात आलं आहे.
शिवसेनेतल्या वादानंतर महाविकास आघाडीचं सरकार पडलं. त्यानंतर आता शिवभोजन थाळीचं काय होणार असा प्रश्न उभा राहिला होता. त्यानंतर मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही थाळी सुरूच राहणार असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर ही थाळी अद्याप बंद झालेली नाही. मात्र या शिवभोजन थाळीच्या नवी मुंबई आणि ठाण्यातल्या केंद्रांचे तीन महिन्याचे अनुदान थकले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात दर १५ दिवसांनी शिवभोजन थाळीसाठी अनुदान काढण्यात येत होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाणे जिल्ह्यात शिवभोजन थाळीची ६० केंद्रं आहेत. पण या सगळ्याच केंद्रांचं कोट्यवधींचं अनुदान अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडे थकलेलं आहे. कोरोना काळामध्ये तसंच त्यानंतर शिवभोजन थाळीचा गोरगरीबांना आधार होता. मात्र हे अनुदान रखडल्याने आता केंद्र चालकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….