शेतकऱ्यांना दिलासा ; अखेर वसंत कारखाना भाडेतत्त्वावर दिला , याच वर्षी होणार गाळप….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना आज अखेर भाडेतत्त्वावर गेला असून वसंत सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम याच वर्षी सुरु होणार आहे. वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर घेण्यासाठी विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या विभागातील अनेक टेंडर प्राप्त झाले होते यात बऱ्याच प्रमाणात स्पर्धा होती परंतु हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी पुढाकार घेतला त्यांनी हा कारखाना भैरवनाथ शुगर उस्मानाबाद या नावाखाली घेतला असून दरवर्षी 75 लाख ठराविक भाडे आणि गाळपवार प्रति टन 172 रुपये भाडे याप्रमाणे हा कारखाना भाडेतत्त्वावर घेतला आहे आज त्यांचे मंत्री समितीने टेंडर मंजूर केले असून हा कारखाना भाडे तत्त्वावर देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा कारखाना भाडेतत्त्वावर गेल्यामुळे लवकरच हंगाम सुरू होणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळनारआहे .मागील वर्षी उस लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक असल्याने जिल्ह्यासह शेजारील कारखाना यांनी शेतकऱ्यांची मोठी अडवणूक केली होती काही शेतकरी यांना तर शेतातील ऊस कारखान्यापर्यंत पाठविण्यासाठी लाखो रुपये खर्च आला जिह्यासह जिल्हा शेजारी सर्वच कारखाने खाजगी मालकीची असल्याने त्यांच्या मोनोपली ला शेतकरी बळी पडले परंतु विदर्भातील शासकीय ताब्यातील हा कारखाना भाडेतत्त्वावर दिल्याने शेतकरी आनंदी आहे. हा कारखाना सुरू होणार असल्यामुळे शेतकऱ्याच्या अडचणी कमी होनार आहेत. पुसद महागाव उमरखेड आणि हदगाव या चार तालुक्याची कामधेनू सलेला हा कारखाना भाडेतत्त्वावर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. हा कारखाना चालू होणार असल्याने ऊसाची लागवड निश्चितच वाढणार आहे विशेष म्हणजे हा कारखाना लागवड हंगामात भाडेतत्त्वावर गेला असल्याचे उसाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे तसेच या विभागाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी हा कारखाना घेतल्यामुळे जनतेत आनंदाचे वातावरण आहे. हा कारखाना भाडेतत्त्वावर जाण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, आमदार नामदेवराव ससाने,भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा तसेच कारखान्याचे आवसायक योगेश गोतरकर यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….