अंधेरी पोटनिवडणूक : काय असणार ठाकरे गटाचा प्लान बी, या आहेत दोन्ही गटाच्या शक्यता….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अंधेरी पूर्व मतदारसंघातील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. ही निवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. दरम्यान, शिवसेनेचे आता दोन गट झाले आहेत.
म्हणून या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी दिली जात आहे. मात्र, ऋतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी दिलेला राजीनाम्याचा अर्ज अजूनही BMC प्रशासनानं स्वीकारला नाही. यामुळे उमेदवारी नाकारली जाण्याची शक्यता आहे. जर त्यांचा राजीमाना मंजूर झाला नाही तर उद्धव ठाकरे गटाचा प्लान बी काय असू शकतो, याबाबत जाणून घ्या.
अंधेरी पोटनिवडणुकीत काय असू शकतो,उद्धव सेनेचा प्लॅन B तांत्रिक कारणावरून जर ऋतुजा रमेश लटके यांचा राजीनामा,मंजूर झाला नाही तर? तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची रणनीती काय असू शकते? तर उद्धव ठाकरे यांच्या गटासमोर दोन पर्याय आहेत. 1. हायकोर्टात दाद मागायची (अर्थात ऋतुजा लटके यांचा रोल महत्वाचा) 2. नवीन उमेदवार द्यायचा (त्यासाठी विश्वनाथ महाडेश्वर यांचं नाव चर्चेत आहे) काय असू शकतो, बाळासाहेबांची शिवसेनेचा प्लॅन B 1. ऋतुजा लटके यांचा राजीनामा अर्ज पूर्वलक्षीप्रभावानं मंजूर झाला तर त्यांची सहमती असू शकते, असा अर्थ लावला जातोय.
मग त्या असू शकतात उमेदवार. 2. जर त्यांचा राजीनामा मंजूर झाला नाही तर ही जागा, युती म्हणून भाजपचा उमेदवार निश्चित होऊ शकतो. 3. असं झालं तर भाजपचे मुरजी पटेल हे युतीचे उमेदवार म्हणून आपला अर्ज, मोठं शक्तिप्रदर्शन करून दाखल करतील.
जर असं झालं तर अंधेरी पोटनिवडणुक ही – मुरजी पटेल (महायुती उमेदवार) Vs विश्वनाथ महाडेश्वर (मविआ उमेदवार) या दोघांमध्ये होऊ शकते.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….