पक्षचिन्ह मिळताच ठाकरेंना मोठा धक्का ; पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- उद्धव ठाकरे यांना निवडणूक आयोगाने नवे पक्षचिन्ह आणि नाव बहाल केल्यानंतर ठाकरेंना पहिला धक्का बसला आहे. ठाकरे गटातील तीन उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुखांनी शिंदे गटाची वाट धरल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेना सिंधुदुर्गात मोठं खिंडार पडलं आहे.
सिंधुदुर्ग येथील सचिन देसाई, सुनील डुबळे आणि बाळा दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर ठाकरे यांना नवं निवडणूक चिन्ह दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांना हा मोठा धक्का बसल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तर शिंदे गटाला अजून पक्षचिन्ह मिळालेले नाही.
दरम्यान, शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह मिळाले असून शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे तळपता सुर्य, ढाल तलवार आणि पिंपळाचे झाड हे चिन्ह पाठवले आहेत. त्यापैकी एक चिन्ह शिंदे गटाला मिळणार आहे. ठाकरे गटासाठी ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ आणि शिंदे गटासाठी ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव निवडणूक आयोगाने दिले आहे.
नवं चिन्ह आणि नवं नाव मिळाल्यावर दोन्ही गटाला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातच अंधेरी पूर्व येथील पोटनिवडणुक तोंडावर आली असताना ठाकरे गटाला हे धक्के बसत आहेत. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटासाठी पक्षसंघटना खूप महत्त्वाची ठरणार आहे. तर रमेश लटके यांच्या पत्नीला शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मशाल या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….