दाऊद टोळी मुंबई पोलिसांच्या रडारवर ; ५ जणांच्या मुसक्या आवळल्या….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी विभागाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ‘डी कंपनी’शी संबंधित पाच जणांना अटक केली आहे.
खंडणी प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊदचा जवळचा गँगस्टर छोटा शकील आणि रियाज भाटी या सलीम फ्रूटला अटक केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Latest Mumbai News In Marathi)
गेल्या काही दिवसांपासून दाऊद टोळीतील मुंबईतले सक्रिय सदस्य मुंबई पोलिसांच्या रडारवर होते. अजय गोसारिया, फीरोज चमडा, समीर खान,अमजद रेडकर आणि यासह आणखी एका आणखी दाऊद टोळी संबांधित व्यक्तीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी गँगस्टर छोटा शकीलच्या भावाला अटक केली होती. सलीम फ्रूट आणि दाऊदचा जवळचा सहकारी रियाझ भाटी मोक्का कारवाई केल्यानंतर डी गॅंग सदस्य पोलिसांच्या रडारवर होते. या दोघांचे जबाब नोंदवल्यानंतर या टोळीतील आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या पाचही जणांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार असून तेथे त्यांची पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांकडून पैसे उकळणारे डी कंपनी संबंधित आरोपी पोलिसांच्या रडारवर होते. या प्रकरणी आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….