शिंदे-फडणवीसांनी नाकारले भुजबळांचे निमंत्रण….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी नाकारल्याचे सांगण्यात येते.
छगन भुजबळ १५ ऑक्टोबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करत आहेत. यानिमित्त अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन गुरुवारी (ता.१३) षण्मुखानंद सभागृहात करण्यात आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अध्यक्षस्थानी असतील. केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे उपस्थित राहणार असल्याची माहिती छगन भुजबळ गौरव समितीचे निमंत्रक प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार हर्षल प्रधान व विजय सावंत यांनी लिहिलेल्या छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच भुजबळ यांच्या जीवनावर आधारित ७५ निवडक छायाचित्र पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे. अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त राज्यभर सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहेत.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….