अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार, शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँगेस, राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून महाविकास आघाडी ही निवडणूक एकत्र लढवेल, अशी घोषणा आज्ता तिन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत रंगशारदा येथे करण्यात आली.
शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे. 13 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला जाईल, असे शिवसेना विभागप्रमुख अॅड. अनिल परब यांनी सांगितले. यावेळी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, राष्ट्रवादीच्या राखी जाधव उपस्थित होते.
अडचणीतील मित्राला मदत करणे हाच आमचा धर्म
कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पटोले यांनी आम्ही शिवसेनेसोबत आहोत असे पत्रकारांना सांगितले. आमचा हात निश्चितच त्यांच्यासोबत राहील. अडचणीतील मित्राला मदत करणे हाच आमचा धर्म आहे, असे ते म्हणाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….