मुंबई-पुणे महामार्गावर बसवर दगडफेक ; अनेक प्रवासी जखमी, धक्कादायक कारण समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे 10 ऑक्टोबर :- मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मुंबईलेनवर एका लक्झरी बसवर अज्ञात इसमानी दगडफेक केली. या विचित्र घटनेत बसचं मोठं नुकसान झालं आहे.
तर बसमधील प्रवासी भयभीत झाले. या दगडफेकीत काही प्रवाशांना दुखापतही झाली आहे. या घटनेनंतर बसमधील जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
फूड मॉलमध्ये प्रवासी आणि व्यवस्थापक यांच्यात वाद झाला होता.
किरकोळ कारणावरुन त्यांच्यात या वाद झाला होता. यावरुनच ही दगडफेक करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. यानंतर लगेचच पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.
पोलीस सध्या याबाबतचा अधिक तपास करत आहेत. खालापूर टोलनाक्याजवळ अज्ञातांनी या खासगी बसवर दगडफेक केली आहे. अचानक झालेल्या या दगडफेकीमुळे बसमधील प्रवासी भयभीत झाले होते. दगडफेकीत या लक्झरी बसच्या काचा फुटल्या.
या हल्ल्यात अनेक प्रवासी जखमीही झाले आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे.
घटनास्थळावरील काही फोटो समोर आले आहेत, ज्यामध्ये बसची समोरची काच आणि खिडकीच्या काचा फुटलेल्या दिसत आहेत.
यावरुनच अंदाज लावता येईल की ही दगडफेक किती भयानक होती. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं आतापर्यंत समोर आलेलं नाही. मात्र घटनेत काही प्रवासी जखमी झाले आहेत. पोलीस सध्या याबाबत तपास करत असून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….