माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला आहे.
देशमुख यांना वैद्यकीय उपचारासाठी न्यायालयाने परवानगी देण्यात आली आहे. मागील अनेक दिवसांपासून तुरुंगात असणाऱ्या देशमुखांनी उपचारासाठी रुग्णालयामध्ये जाण्याची परवानगी मागितली होती.
त्यांची ही मागणी आता मुंबई सत्र न्यायालयाने मान्य केली असून जसलोक रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार करण्यात येणार आहेत. तर जसलोक रुग्णालयामध्ये अॅजिओग्राफी करण्यात येणार असल्याचीही माहीती समोर येत आहे.
न्यायालयाकडून देशमुखांना आज दुसरा दिलासा दिला आहे. कारण मागील काही दिवसांमध्ये देशमुख यांना ईडीच्या गुन्ह्यातून त्यांना जामीन मिळाला होता. परंतु सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्यात मात्र त्यांना जामीन मिळालेला नसल्यामुळे ते तुरुंगामध्येच आहेत. अशातच आता न्यायालयाकडून उपचारासाठी परवानगी दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….