माहूर ग्रामीण रुग्णालयातील सर्वच डॉक्टर उत्तम प्रकारे आपली आरोग्य सेवा बजावतात :- किशन राठोड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
राजकिरण देशमुख
माहूर :- माहूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे कामकाज अत्यंत सुरळीत सुरु असून कोणत्याही रुग्णांना या ठिकाणी डॉक्टरांची प्रतीक्षा किंवा डॉक्टरकडून दुर्लक्षित केले जात नाही रुग्णालयातील सर्वच डॉक्टर २४/७ कार्यरत असून उत्तम प्रकारे आपली सेवा बजावतात आणी आलेल्या रुग्णांवर वेळेवरच उपचार केले जातात,कुठल्याही प्रकारच्या रुग्णांना या ठिकाणी त्रास उदभवले नसून तश्या प्रकारची कुठल्याही रुग्णाची, तोंडी अथवा लेखी तक्रार ग्रामीण रुग्णालयाच्या विरोधात आलेली नाही.
परंतु काही स्वयंघोषित राजकीय नेते जाणीवपूर्वक पत्रकारांना हाताशी धरून माहूर ग्रामीण रुग्णालयाची बदनामी करण्याचे काम करत आहेत, जे अतिशय खालच्या पातळीचे राजकारण आहे , त्या स्वयंघोषित राजकीय नेत्यांना राजकारणच करायचे असेल तर तालुक्यात ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद,विधानसभा, लोकसभा, अश्या निवडणुका आहेत त्यांनी खुशाल त्या ठिकाणी राजकारण कराव परंतु ज्या ठिकाणी सर्व प्रकारच्या रुग्णांना निस्वार्थ सेवा दिली जाते अश्या ठिकाणी मात्र राजकारण करू नये
शेवटी काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देता येत नसेल तर त्यांचे खच्चीकरण ही करू नये,
माहूर तालुक्यामध्ये सर्वात उत्तम प्रकारे सेवा जर कोणी देत असेल तर तो माहूर येथील ग्रामीण रुग्णालय आहे.
केवळ राजकीय द्वेषा अभावी तालुक्यातील कुठल्याच शासकीय विभागाला विनाकारण त्रास देण्याचा किंवा बदनाम करण्याचे काम करू नये
माहूर ग्रामीण रुग्णालय हे उत्तम प्रकारे सेवा देत असून आरोग्य विभागाची बदनामी करणे हे तालुक्याच्या राजकारणाशी निगडित राजकीय भाग असल्याची प्रखर प्रतिक्रिया रुग्ण कल्याण समितीचे सदस्य किशन दामा राठोड यांनी दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….