ST कर्मचाऱ्यांना खूशखबर मिळणार…? दिवाळी बोनस जाहीर होण्याची शक्यता…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाची बैठक आज बोलावली आहे. या बैठकीत दिवाळी बोनस बाबतची घोषणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
एसटी महामंडळाच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. कर्मचाऱ्यांचे पगार आणि तोट्यातील एसटी फायद्यात आणण्यासाठी करायच्या उपाययोजना याबाबत बैठकीत चर्चा होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी महामंडळाला महिन्याला अडीचशे कोटी रुपयांची गरज असते आणि सरकारकडून महामंडळाला १०० कोटी रुपयांचा निधी लागतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पीएफचा हप्ताही रखडला आहे. या पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 22 बोनस जाहीर झाला आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनाही मोठा बोनस जाहीर आहे. त्यामुळे यंदा चांगला बोनस मिळेल अशी अपेक्षा एसटी कर्मचाऱ्यांना आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….