ठाण्यात शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे-ठाकरे गट भिडले, नरेश मस्के-केदार दिघेही धावले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
ठाणे :- मनोरमा नगर येथे शाखा ताब्यात घेण्यावरून झालेला वाद शांत होत नाही तोच शुक्रवारी आनंद नगर कोपरी या भागात पुन्हा शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट समोरासमोर आले.
या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरून हा वाद सुरू झाल्याचं बोललं जात आहे रात्रीपासून या शाखेच्या इकडे गर्दी होती, सकाळी मात्र शाखा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गट समोरासमोर आले. त्यामुळे काही काळ या भागात तणाव झाला होता.
या घटनेनंतर या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी शाखेच्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी शाखेचे कुलूप उघडून शाखेचा ताबा घेतला. शाखेवर कोणीही हक्क सांगू नये, त्यांना काम करायचे असेल तर त्यांनी बसावे काम करावं शाखा शिवसेनेचीच आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी नरेश म्हस्के यांनी दिली. तर, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार देखे यांनी देखील या ठिकाणी धाव घेतली होती. कोपरी पाचपाखडी हा मतदार संघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा येतो. परंतु, त्यांच्या या मतदारसंघातच ठाकरे गट आणि शिंदे गट हे एकमेकांसमोर उभे ठाकल्याचे दिसून आले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….