धनुष्यबाणासाठी निवडणूक आयोगात सामना, ठाकरे गट दुपारी 1 वाजता उत्तर दाखल करणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दसरा मेळाव्याची लढाई संपल्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई पक्षाच्या चिन्हाबाबत असणार आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर धनुष्यबाण चिन्ह कुणाचं यावर निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या लढाईत आजचा दिवस महत्त्वाचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांना आज आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. ठाकरे गट (Thackeray Group) आज दुपारी एक वाजता आपलं प्राथमिक उत्तर निवडणूक आयोगात दाखल करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल देसाई आणि वकिलांची टीम दिल्लीत दाखल झाली आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 14 ऑक्टोबर ही आहे. त्याआधी चिन्हाचं काय होणार याकडे लक्ष लागलं आहे.
दरम्यान उद्धव ठाकरे गटाकडून चिन्हाचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात आहे. त्यामुळे धनुष्यबाण चिन्हाचा निकाल तात्काळ लावा अशी मागणी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात शिंदे गटाकडून 4 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलं आहे.
शिवसेनेतल्या दोन गटांसाठी निवडणूक आयोगात आजचा दिवस का महत्त्वाचा आहे आणि त्यांच्याकडून नेमकं काय अपेक्षित आहे, ते पाहूया…
पक्षामध्ये उभी फूट झाली आहे की नाही हे ठरवून निवडणूक आयोगाला निकाल द्यायचा आहे
पक्षाच्या वेगवेगळ्या स्तरांवर, कार्यकारणीत किती लोक आपल्या बाजूने आहेत याचे आकडे द्यावे लागणार
सोबत त्यांची शपथपत्रे निवडणूक आयोगाला दिली जाणार
विधीमंडळ पक्षासोबतच पक्षाच्या इतर शाखा आहेत याची माहिती आयोगाला द्यावी लागणार
शाखामधलं देखील संख्याबळ असंच शपथपत्राद्वारे सादर केलं जाऊ शकतं
आज दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर निवडणूक आयोग निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमुळे धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोग गोठवण्याची शक्यता

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….