शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक आयोग उद्या निर्णय देणार…? चिन्हासाठीची लढाई अंतिम टप्प्यात….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दसरा मेळाव्याची (Dasara Melava) लढाई संपल्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातली पुढची लढाई आता जवळ येऊन ठेपलीय.
शिवसेनेच्या (Shivsena) धनुष्यबाण या चिन्हाचं नेमकं काय होणार याचा निर्णय पुढच्या काही तासात होण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजे 7 तारखेपर्यंत शिवसेनेच्या दोन्ही गटांना आपली बाजू निवडणूक आयोगात मांडायची आहे. एकीकडे अंधेरीची पोटनिवडणूक (Andheri Bypoll Election) जाहीर झाली आहे, उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रियाही सुरु होत आहे. त्यामुळे चिन्हाचा निर्णय काय होतो याची उत्सुकता आहे.
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची आज कायदेशीर लढाई बाबत वकिलांसोबत महत्त्वाची बैठक आहे. आयोगात प्राथमिक रिप्लाय आज सादर करायचा की उद्या यावर बैठकीत विचार होणार आहे. आयोगामध्ये प्राथमिक रिप्लाय दिल्यानंतर कागदपत्र दाखल करण्यासाठी शिवसेना वेळ मागण्याची शक्यता आहे. जवळपास सहा ते सात लाख अॅफिडेव्हिट सादर करायचे असल्याने वेळ मिळावा ही विनंती आयोगाला केली जाणार आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला केस सुरू असताना चिन्हाबाबात निर्णय घेण्याची परवानगी दिली आहे. या दरम्यान अंधेरीची पोटनिवडणूक देखील जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीचे नोटिफिकेशन उद्या निघणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत उद्यापासून सुरू होणार आहे. या काळात चिन्हाचा निर्णय काय होतो हे पाहणे म्हत्त्वाचे ठरणार आहे. कारण चिन्हाबाबत केस आयोगाच्या दारात पोहचल्यानंतर लगेच निवडणुका असतील तर अनेकदा चिन्ह तात्पुरतं गोठवलं गेल्याचा इतिहास आहे. त्यामुळे या केसमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होतेय का हे पाहावं लागेल. आज ठाकरे गटाकडून काय बाजू सादर होते यावर हा निर्णय अवलंबून असणार आहे.
चिन्हाची केस मुळात आयोगासमोर अजून नीट आलेलीच नाही. अजून दोन्ही बाजूंची कागदपत्रंही आयोगासमोर नाहीत. त्यामुळे निवडणूक जाहीर होतानाची स्थिती आयोगाला कायम ठेवावी लागेल. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल, असा ठाकरे गटाचा दावा आहे.तर शिंदे गटाचा दावा आहे की, विधीमंडळ पक्षातला आमचा दावा आयोगासमोर पोहचला आहे.लोकसभा, विधानसभेत आमच्या गटाला अधिकृत मान्यता आहे. ठाकरे गट वेळकाढूपणा करुन चिन्ह टिकवू पाहत असलं तरी आमच्या तक्रारीची दखल घेत अंतिम निर्णय होईपर्यंत चिन्ह गोठवलंही जाण्याची शक्यता आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….