एकनाथ शिंदेंच्या भाषणाची नाना पटोलेंनी उडवली खिल्ली, म्हणाले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन करतात तसे दसरे मेळावे झाले, असे परखड मत व्यक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दसरा मेळाव्याची खिल्ली उडविली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचुन दाखविल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. काल बुधवारी मुंबई येथे बीकेसी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहिर सभेत काँगेसवर जबर टिका केली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्भव ठाकरे यांच्या मेळाव्यात काँगेस आणि राष्ट्रवादी यांचे कार्यकर्ते असल्याच्या तसेच राहुल गांधी यांच्या भारत जोड़ो यात्रेत ठाकरे समर्थकाचा भरणा असल्याच्या आरोप शिंदे यांनी केला होता. त्यावर नाना पटोले यांनी वरील तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, दोन शाहिर रात्रभर भांडुन लोकांचे मनोरंजन कसे करतात तसे दसरे मेळावे झाले असून एकनाथ शिंदे हे काल दसरा मेळाव्यात मोदी- शहा यांनी लिहिलेली स्क्रिप्ट वाचुन दाखवली, असा आरोपही त्यांनी केला.
काँग्रेसवरील आरोप तेहि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांनी केले, हे हास्यास्पद असल्याचे व्यक्तव्य नाना पटोले यांनी केले. तर यावेळी राहुल गांधी भारत जोडो यात्रेत प्रामाणिक प्रयत्न करत असल्याची पाठ राखणही नाना पटोले यांनी केली.
केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण – काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भेटलेला प्रतिसाद लक्षात घेता हा केंद्रातील मोदी सरकारचा अंतिम क्षण असून हे सरकार जाणार आहे, त्यामुळे किती कोणाला पद वाटायचे वाटून घ्या, असे खोचक टोलाही नाना पटोले यांनी लगावला. माहिती तंत्रज्ञान विषयाच्या स्थायी समितीचे अध्यक्षपद बुलडाण्याचे खासदार शिंदे गटातील प्रतापराव जाधव यांच्याकडे देण्यात आल्यानंतर त्यांनी हा टोला लगावला. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणूकमध्ये काँग्रेस आपला उमेदवार उभा करणार नसल्याची माहितीही नाना पटोले यांनी दिली. काँग्रेस आपला पाठिंबा शिवसेना उमेदवाराला देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….