जिवंत कोंबड्या आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप ; पक्षाची घोषणा होण्याआधीच “पार्टी”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशभरात दसऱ्याचा उत्साह पहायला मिळात असताना तेलंगणा वेगळाच माहौल आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे विजयादशमी अर्थात दसऱ्याचा दिवशी आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करणार आहेत.
त्याआधीच लोकांना आकर्षित करण्यासाठी चिकन आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने के चंद्रशेखर राव देखील तायरी लागले आहेत. राव अनेक नेत्यांच्या संपर्कात आहेत.
राव यांनी देखील ‘भाजप मुक्त भारत’ असा नारा दिला आहे. तेलंगणा राष्ट्र समिती राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. विजयादशमीला राव आपल्या नव्या राष्ट्रीय पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत.
नव्या पक्षाची घोषणा होण्याआधीच तेलंगणातील टीआरएस नेता राजनाला श्रीहरी हे लोकांना जिवंत कोंबड्या आणि दारूच्या बाटल्याचे वाटप करत आहेत.
याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओ मध्ये कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.

एक टेबल टाकून येथे कोंबड्या आणि दारुच्या बाटल्यांचे वाटप करण्यात येत आहे. मागे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, तसेच इतर नेत्यांचे कट आऊट लावण्यात आले आहेत.
लोक रांग लावून कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेताना दिसत आहेत. या ठिकाणी कोणतीही गर्दी अथवा धक्काबुक्की न करता लोक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने रांग लावून कोंबड्या आणि दारुच्या बाटल्या घेत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….