हिंगोली बाजार समितीत सोयाबीन ४६०० ते ५००० रुपये क्विंटल…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Hingoli APMC) धान्य बाजारात (भुसार मार्केट) गेल्या आठवड्यापासून यंदाच्या खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक (Soybean Arrival) सुरू झाली आहे.
शनिवारी (ता. १) सोयाबीनची ३०० क्विंटल आवक होती. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५००० रुपये तर सरासरी ४८०० रुपये दर (Soybean Rate) मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.
Soybean Rate : सोयाबीन बाजार कसा राहील?
मंगळवारी (ता. २७) ते शनिवार (ता. १) या कालावधीत हिंगोली येथील धान्य बाजारात सोयाबीनची २१८५ क्विंटल आवक झाली. प्रतिक्विंटल सरासरी ४७०७ ते ४८०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. ३०) सोयाबीनची ४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५००० रुपये दर सरासरी ४८०० रुपये दर मिळाले.
गुरुवारी (ता. २९) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४६०० ते कमाल ५०११ रुपये तर सरासरी ४८०५ रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २८) सोयाबीनची ४८५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४८९६ रुपये तर सरासरी ४६९८ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २७) सोयाबीनची ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४५०० ते कमाल ४९१५ रुपये तर सरासरी ४७०७ रुपये दर मिळाले.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….