शिवसेनेच्या शिंदे गटात धुसफूस….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेनेत बंड करून बाहेर पडलेल्या शिंदे गटाचे नव्याचे नऊ दिवस संपत आले असल्याचे चित्र आहे. ठाण्यातील मतदारसंघावरून शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वाद सुरु असल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत.
शुक्रवारी जाहीर झालेल्या शिंदे गटाच्या युवा सेनेच्या कार्यकारिणीत प्रताप सरनाईक यांच्या पुत्राला स्थान मिळाले नसल्याने ही नाराजी सुरु झाल्याचे बोलले जात आहे. मात्र असे असले तरी आमदार प्रताप सरनाईक याचे चिरंजीव पूर्वेश सरनाईक यांनी ‘दो दिल और एक जान है हम’ असे स्पष्टीकरण समाजमाध्यमांवर करत या वादाचा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात मतदारसंघ सोडण्यावरून वाद सुरू असल्याच्या चर्चा आहे. प्रताप सरनाईक हे ठाण्यातील ओवळा माजिवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. हा मतदारसंघ त्यांनी भाजपला द्यावा यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार प्रताप सरनाईक यांच्यात खडाजंगी झाल्याची चर्चा होती. त्यातच शिंदे गटाच्या युवा सेनेच्या आज जाहीर झालेल्या कार्यकारिणीमध्ये बहुसंख्य आमदार पुत्रांना स्थान दिले आहे, मात्र प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वी आदित्य ठाकरे यांच्याबरोबर काम करत असतानाही त्यांना मात्र यात डावलण्यात आले आहे.
सरनाईक यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ भाजपचे मिरा भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांना देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव असल्याचे बोलले जात आहे. हे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लक्षात येताच सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत जाब विचारला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे आणि आमदार सरनाईक या दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाल्याच्या चर्चा आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक झालेले प्रताप सरनाईक यांनी याच मतदारसंघातून ते २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सलग तीनवेळा आमदार झाले आहेत. शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यात सख्य नव्हते. पण, स्थानिक राजकारणासाठी दोघांनी जुळवून घेतले होते. पुढे सरनाईक यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत शिंदे यांना साथ दिली. दरम्यान, यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रेक्षकात बसलेल्या प्रताप सरनाईक बोलावून घेत आपल्या शेजारी व्यासपीठावर बसवून सर्व आलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला.
आमच्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक आहोत. अनेक जण आमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र अशा काड्या करणाऱ्यांना आम्ही भीक घालणार नाही.
– नरेश म्हस्के, प्रवक्ते, शिंदे गट

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….