आदिवासी समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आश्रम शाळा व वस्तीगृहातील विद्यार्थी क्षमता वाढवा ; बिरसा ब्रिगेड ची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- आदिवासी समाजाच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने महागाव तालुक्यात आश्रम शाळेसह नवीन वस्तीगृह देण्याबाबत. तसेच पुसद वस्तीगृहात मुला मुलींचे अडीचशे वाढीव क्षमतेची उपायोजना करण्याबाबतचे निवेदन प्रकल्प अधिकारी तसेच आमदार इंद्रनील नाईक यांना बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे व तालुका अध्यक्ष मारोती भस्मे यांच्या नेतृत्वात आज देण्यात आले.

मागील अनेक वर्षापासून पुसद येथे विद्यार्थ्यांच्या वाढीव संख्येतून वस्तीगृहात उपाययोजना करणे बाबत अनेकदा निवेदन देण्यात आले परंतु अजूनही ते विचाराधीनच आहे. त्यामुळे आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांचे पर्यायाने समाजाचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. पुसद येथे 75 क्षमतेचे वसतिगृह आहे. आणि प्रवेशासाठी अर्ज जास्त येतात त्यामुळे पुसद येथे 250 विद्यार्थ्याचे मुलींचे व मुलांचे वस्तीगृहातील क्षमता वाढीव करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली. तसेच आदिवासी बहुल असलेल्या महागाव तालुक्यामध्ये जवळपास 45 हजार आदिवासी लोकसंख्या आहे. परंतु त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांची सामाजिक व आर्थिक प्रगती साधण्याच्या दृष्टीने प्रकल्प कार्यालय पुसद कडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याची खंत अनेकांनी बिरसा ब्रिगेड संघटनेकडे व्यक्त केली आहे. या परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 100 किलोमीटरच्या दूर असलेल्या ठिकाणी जावे लागत असल्याने व आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने ते शक्य होत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे. आपल्या प्रकल्प कार्यालया अंतर्गत येणाऱ्या उमरखेड तालुक्यातील बोरीवन येथील शासकीय आश्रम शाळा ही पटसंख्या अभावी सन 2011- 12 मध्ये बंद करण्यात आली आहे. व तेथील कर्मचारी यांना इतरत्र समायोजन करण्यात आले आहे. एकीकडे महागाव तालुक्याचे शैक्षणिक प्रगती खालावली जात असल्याने आपल्याकडे आश्रम शाळा चालवण्या इतपत कर्मचारी व सर्व व्यवस्था असताना व त्याची मागणी ही असताना याकडे दुर्लक्ष होत आहे. तेंव्हा बोरीवन येथील शासकीय आश्रम शाळा ही पटसंख्या अभावी सन 2011-12 मध्ये बंद करण्यात आलेले आहे. सदर शाळा महागाव तालुक्यात सुरू केल्यास तेथील आदिवासी समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दृष्टीने हिताचे होईल. व येत्या सण २०२३ – २४ च्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता यावा या दृष्टीने कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनात बिरसा ब्रिगेड यांनी केली आहे. प्रकल्प अधिकारी पुसद तथा लोकप्रतिनिधी आमदार इंद्रनील नाईक यांनी याबाबतचे त्वरेने नियोजन करावे अन्यथा नाईलाजास्तव बिरसा ब्रिगेड ला आदिवासी समाजाला शैक्षणिक प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशाराही दिवसा ब्रिगेडच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केला आहे.
या निवेदनावर बिरसा ब्रिगेडचे विदर्भ पांडुरंग व्यवहारे, तालुका अध्यक्ष मारोती भस्मे, तसेच गजानन उघडे, अर्जुन हगवणे, संजय डुकरे, विठ्ठल मिरासे, राजू पेदेवाड, सचिन पेदेवाड, अक्षय व्यवहारे, वसंत चिरमाडे, अशोक खंदारे, युवराज भांगे, गुरुदास खंदारे, माधव भांगे, हनुमान ठाकरे, बबन तांबारे, गणेश आढाव, सिताराम बाबळे, सखाराम इंगळे, दिगंबर इंगळे, ज्ञानेश्वर जंगले, प्रदीप घावस, राजेश देवतळे यांच्यासह बिरसा ब्रिगेडचे असंख्य कार्यकर्ते निवेदन देताना हजर होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…