भिम टायगर सेना नांनद ई. शाखेचा अनावरण सोहळा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- तालुक्यातील नानद ई. येथे भिम टायगर सेना शाखेचे उद्घाटन दि.२८ सप्टेंबर रोजी येथे सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष भीम टायगर सेना दादासाहेब शेळके व जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे व नानद ई. येथील समस्त नागरिक महिला वर्ग व भीम टायगर सेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की प्रथम तथागत गौतम बोद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. लक्ष्मण कांबळे यांनी आपले प्रास्ताविक केले व जिल्हा अध्यक्ष किशोर कांबळे यांनी भीम टायगर सेना याचे स्वरूप सांगितले आणि यानंतर शेवटी अध्यक्षीय भाषण दादासाहेब शेळके यांनी आपल्या कणखर वाणीतून संविधानाच्या प्रत्येक आर्टिकल ची माहिती सांगितले या कार्यक्रमात मुख्य उपस्थिती खंदारे अध्यक्ष पुसद, राजकुमार पठाडे, दीपक गायकवाड शाखा अध्यक्ष, काटखेडा राहुल झुंजारे ,समस्त गावकरी मंडळी उपस्थित होती या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ सरकटे अध्यक्ष भिम टायगर सेना नानद ई. शालीपुत्र ढोले उपाध्यक्ष, किसन सिताराम सोंगाडे कोषाध्यक्ष, सुरेश धुळे सचिव, देविदास धुळे सहसचिव, संजय धुळे सल्लागार, आकाश धुळे संघटक, तसेच सदस्य पंजाब धुळे टेलर, गणेश धुळे, कैलास धुळे, रवी धुळे, ओम धुळे, रमेश धुळे, राजू कांबळे, दीपक धुळे, आकाश धुळे, गौतम धुळे, राजू धुळे, जितेंद्र धुळे, दिनेश धुळे, सुभाष धुळे, संतोष गायकवाड, अविनाश धुळे, लखन धुळे, संदीप सरकाटे, आत्माराम सरकाटे, यशवंत कांबळे, अर्थराज धुळे, जनार्दन धुळे, आनंदराव पठाडे ,प्रदीप धुळे, या कार्यकर्त्यांचा सहभाग होता .