शिंदे-फडणवीस म्हणाले ‘देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’ पण पुणे पोलिसांनी उचललं मोठं पाऊल…!
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याप्रकरणी ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्यांच्याबाबत पुणे पोलिसांनी मोठा पाऊल उचललं.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आलं आहे. पुणे पोलिसांनी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) एका जुन्या निकालाचा दाखला दिलाय. या निकालानुसार घोषणाबाजी करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येऊ शकत नाही, असं पुणे पोलिसांनी म्हटलंय.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनीही घोषणाबाजी देणाऱ्या संशयितांवर गुन्हा दाखल केला. पण अखेर गुन्हा दाखल केलेल्यांवरील देशद्रोहाचं कलम मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय.
पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांची हयगय केली जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी म्हटलं होतं. पोलिसांनी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं.
दरम्यान, आता देशद्रोहाचं कलम लावण्यात न आल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यताय. पीएफआय वर एनआयएने कारवाई केल्यानंतर राज्यात सध्या वातावरण तापलंय. भाजपसह मनसेनंही पीएफआयविरोधात आक्रमत पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्यभर निदर्शनंही रविवारी करण्यात आलेली. अखेर मुख्यमंत्र्यांनी आणि गृहखातं सांभाळणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्याची गंभीर दखल घेतली होती.
गेल्या आठवड्यात राज्यातीलच नव्हे तर देशातील वेगवेगळ्या भागात एनआयएनं छापेमारी केली होती. या छापेमारीदरम्यान, टेटर फंडिंगच्या आरोपाखाली पीएफआय म्हणजेच पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया एनआयएच्या रडारवर आली होती. अखेर याप्रकरणी एनआयएनं मुंबई, नवी मुंबईसह वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत गेल्याच आठवड्यात कारवाई केली होती. त्यानंतर पीएफआयविरोधात राज्यातील राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला होता.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…