गाडीत माझ्यासोबत बहीण-पत्नी नसती तर खाली उतरून एक घाव दोन तुकडे केले असते : बांगर…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली :- हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला आहे. संतोष बांगर हे काल अंजनगांव सुर्जी येथील देवनाथ मठातून दर्शन घेऊन निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर बुक्क्या मारत हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष बांगर यांच्या वाहनांचा ताफा अंजनगांव सुर्जी येथे येताच कार्यकर्ते वाहतांना आडवे गेले. यावेळी आमदार ज्या बाजूला गाडीत बसले होते त्या गाडीचा दरवाजा देखील उघडला. परंतु, सुरक्षा रक्षकाने धाव घेत दरवाजा बंद केला. यावेळी शिवसैनिक खूपच आक्रमक झाले होते. परंतु, बांगर यांनी आपली गाडी न थांबवता तेथून निघून गेले.
दरम्यान, या हल्ल्यानंतर संतोष बांगर हे प्रचंज आक्रमक झाले आहेत. त्यावेळी गाडीत माझ्यासोबत माझी बहीण आणि पत्नी नसत्या तर मी खाली उतरून संतोष बांगर (Santosh Banger) काय आहे, हे दाखवून दिले असते. एक घाव दोन तुकडे केले नसते तर स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचा सैनिक म्हणवून घेतले नसते, अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी व्यक्त केली. संतोष बांगर हे कुटुंबीयांसोबत देवदर्शनासाठी गेले असताना हा हल्ला झाला होता. हा हल्ला म्हणजे ठरवून केलेले एक षडयंत्र असल्याचा दावा संतोष बांगर यांनी केला. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यासोबत फोनवरून संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे आमदार बांगर यांनी स्पष्ट केले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…