गोंदियातील धक्कादायक प्रकार, ट्रकमध्ये तब्बल १२० विद्यार्थ्यांना जनावरांसारखे कोंबले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
गोंदिया :- गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.
देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत.
आदिवासी शाळेतील १२० मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियातून समोर आला आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थींनीची प्रकृती बिघडली आहे. तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली. देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले आहेत. ट्रकमधील गर्दीमुळे विद्यार्थी गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले.
गोंदिया तालुक्यातील शासकीय आदिवासी शाळा, मजितपूर येथील विद्यार्थ्यांना अमानवी पद्धतीने ट्रकध्ये कोंबण्यात आले होते. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी शाळा प्रशासनातर्फे नेले जात होते. तिथून परतत असताना हा प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला. अखेर गाडी थांबवण्यात आली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…