तुम्हीच मुंबईची वाट लावली’ ; चंद्रकांत पाटलांची आदित्य ठाकरेंवर सडकून टीका….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आपल्या अहंकारापायी मुंबईची वाट लावली अशा शब्दात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनानेते आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी चंद्रकांत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. यावेळी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
वेदांत- फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे. वेदांता गुजरातला गेल्याच्याविरोधात शिवसेना नेते, युवासेने प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या तळेगाव येथे जन आक्रोश आंदोलन करण्यात आले.
हाच मुद्दा पकडत चंद्रकांत पाटील यांनी आदित्या ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. ”आदित्य ठाकरे यांनी जाहीर कराव. प्रत्येक गोष्टीची एक फाईल असते. घटनाक्रम असावा. निर्मला सीतारामण यांनी एक यादी घोषीत केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून किती प्रकल्प बाहेर गेले सांगण्यात आले आहे. नाणारचे प्रकल्प, मुंबईची मेट्रो हे मोठं उदाहरण आहे. आपल्या अहंकारापायी मुंबईची वाट लावली. मेट्रो रेगांळली. त्याचा खर्च वाढला. ”असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर केला आहे.
तसेच, त्यांनी कोणकोणते प्रकल्प पळवून लावले हे मी सांगणार नाही. पण ज्या प्रकल्पावरुन राजकारण सुरु आहे. त्याची एकदा जाहिरपणे आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेऊन घटनाक्रम मांडावा. अशी खोचक मागणी केली. प्रकल्प आणला म्हणजे काय आणलं होतं. पळून जाण्यामध्ये तुमचा रोल किती मोठा? कसं तुम्ही आडवलं. तुम्ही त्यांना कसं सहकार्य केलं नाही. यासर्वांची माहिती पत्राकार परिषदेत द्यावी. अस चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. यसोबतच, ते आक्रोश यात्रा काढत आहे. पण ते त्यांच्या पायावर कुर्हाड मारण्याचं काम करत आहेत, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…