घंटीबाबा यात्रेदरम्यान चोख बंदोबस्त ठेवा ; यात्रा महोत्सव आढावा सभेत मंत्री संजय राठोड यांचे निर्देश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 सप्टेंबर :- दिग्रस येथे येत्या 7 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित घंटीबाबा मंदिर यात्रा महोत्सवात जादा पोलीस कुमक बोलावून चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिल्या.
ना. संजय राठोड यांनी आज दिग्रस विश्राम गृह येथे घंटीबाबा मंदिर यात्रा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेतला. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर, तहसिलदार प्रविण धानोरकर, घंटीबाबा मंदिर संस्थानाचे सचिव प्रदिप मेहता, नगरपरिषद, महावितरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मंत्री संजय राठोड पुढे म्हणाले की यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करावे, कोणतीही अनुचीत घटना घडू नये यासाठी दक्षता घ्यावी, यात्रेदरम्यान सी.सी.टी.व्ही. व वॉच टॉवर लावणे तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात यावी. याठीकाणी आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाने यात्रेदरम्यान अन्न पदार्थांचे नमुने तपासून नागरिकांना चांगले अन्न उपलब्ध होईल याची खबरदारी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. सर्व विभागांनी आपल्या विभागाच्या योजनांबाबत स्टॉल लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.
याप्रसंगी संबंधीत विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…