“ईडी , सीबीआय च्या गैरवापरात पंतप्रधान मोदींचा हात नाही” ; ममता बॅनर्जीचं आश्चर्यचकित करणारे विधान….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- राज्यातील केंद्रीय संस्थांच्या कारवायांमागे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात आहे, असे आपल्याला वाटत नाही, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
एवढेच नाही, तर भाजप नेत्यांचा एक गट आपले हीत साध्य करण्यासाठी या संस्थांचा गैरवापर करत आहे, असा आरोपही ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांच्या “अतिरेका”विरोधात विधानसभेत मांडण्यात आलेल्या एका ठरावावर बोलताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, केंद्र सरकारचा अजेंडा आणि त्यांच्या पक्षाचे हितसंबंध एकत्र येऊ नयेत, याची काळजी घेण्यात यावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे. भाजपने या प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर, हा प्रस्ताव विधानसभेत मंजूर करण्यात आला.
‘केंद्र हुकूमशाह सारखे वागत आहे’ –
बॅनर्जी म्हणाल्या, ‘केंद्रातील सध्याचे सरकार एखाद्या हुकूमशाह सारखे वागत आहे. हा प्रस्ताव कुण्या एका विशेष घटनाविरोधात नाही. तर केंद्रीय संस्थांच्या पक्षपाती कामकाजाविरोधात आहे.’ तर ईडी आणि सीबीआय विरोधातील अशा प्रकारचा प्रस्ताव विधानसभेच्या नियमांविरोधात आहे, असे भाजपने म्हटले आहे. हा प्रस्तावाच्या बाजूने 189 तर विरोधात 69 मते पडली.
‘भाजप नेते रोजच्या रोज देतात धमकी’ –
खरे तर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्था पश्चिम बंगालमध्ये अनेक प्रकरणांचा तपास करत आहेत. यात तृणमूल काँग्रेसचे अनेक वरिष्ठ नेते आरोपी आहेत. बॅनर्जी म्हणाल्या, ‘भाजप नेते रोज विरोधी पक्षातील नेत्यांना सीबीआय आणि ईडीची धमकी देत आहेत. केंद्रीय संस्थांनीही देशात अशा पद्धतीने कामकरणे योग्य आहे? यामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील, असे मला वाटत नाही. मात्र, काही भाजप नेते अपल्या हितासाठी सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत आहेत.’

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…