पत्राचाळ प्रकरणात राऊतच दोषी..? ; ईडी कडून ४ हजार पानी आरोप पत्र दाखल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- न्यायालयीन कोठडीत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आता ईडीकडून आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये संजय राऊत दोषी ठरवण्यात आले आहेत. कालच संजय राऊत यांच्यावर झालेल्या सुनावणीत त्यांची कोठडी ४ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.
गोरेगाव पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ईडीने त्यांच्या विरोधात ४ हजार पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रात संजय राऊतांना दोषी ठरवण्यात आलं आहे. पत्राचाळ प्रकल्पातून राऊतांनी पैसे कमावले, असं या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे.
पत्रकारांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाधवान बंधूंसोबत संगनमत करून संजय राऊतांनी पत्राचाळ प्रकरणातून पैसे कमावले असल्याचं आरोपपत्रात म्हटलं आहे. पत्राचाळ प्रकरणातले प्रमुख आरोपी संजय राऊतच असल्याचंही यात म्हणटलं आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीत हा घोटाळा झाला असून राऊतांच्या परदेश दौऱ्याचे पैसे याच कंपनीतून आले आहेत, असाही उल्लेख या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…