अमित शाह यांची सुरक्षा पुन्हा भेटली ; TRS नेत्यानं ताफ्यापुढच पार्क केली कार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हैदराबाद :- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षा व्यवस्थेत पुन्हा एकदा निष्काळजीपणा झाल्याचं समोर आलं आहे. तेलंगाणा मुक्ती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी ते हैद्राबादच्या दौऱ्यावर आहेत.
या ठिकाणी शाह यांच्या ताफ्याच्या समोरच तेलंगाणा राष्ट्र समितीच्या (TRS) एका नेत्यानं आपली कार पार्क केली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं मोठी खळबळ माजली.

मुक्तीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी अमित शाह शुक्रवारी रात्री उशीरा हैद्राबादेत पोहोचले. याचवेळी शाह यांच्या ताफ्याच्या पुढे टीआरएस नेता गोसुला श्रीनिवास यांनी अचानक आपली कार उभी केली. या प्रकारामुळं सुरक्षा रक्षकांमध्ये खळबळ माजली. पण त्यांनी तात्काळ सतर्क होत त्यांची कार तिथून हटवली.
दरम्यान, आपल्या कारची तोडफोड केल्याचा आरोप श्रीनिवास यांनी केला आहे. मी कार चालवताना तणावाच्या स्थितीत होतो त्यामुळं अचानक माझी कार त्या ठिकाणी थांबली. पण कार हटवण्यापूर्वीच सुरक्षा रक्षकांनी माझ्या कारची तोडफोड केली. याप्रकरणी मी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुंबईतही सुरक्षा भेदण्याचा झाला होता प्रयत्न
यापूर्वी गेल्या सोमवारी मुंबईमध्ये अमित शाह यांची सुरक्षा भेदून एक अनोळखी व्यक्ती सुमारे एक तास शाहांच्या आजूबाजुला घुटमळत होता. आपणं आंध्र प्रदेशातील एका खासदाराचा खासगी सचिव असल्याचं त्याचं म्हणणं होतं. यानंतर मुंबई पोलिसांनी धुळे जिल्ह्यातून हेमंत पवार नामक व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं. त्याच्याजवळ गृहमंत्रालयाचं ओळखपत्र होतं. हा व्यक्ती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या घराबाहेरची दिसून आला होता. या आरोपीला कोर्टानं सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…