शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पद उमरखेडला द्या ; निष्ठावंत शिवसैनिकांची मागणी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- राज्यात शिवसेनेच्या फुटीनंतर जिल्हयांतर्गतही शिवसेनेत मोठी उलथापालथ झाली. मंत्री संजय राठोड यांनी शिन्दे गटाची कास धरली असतांना, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांचेसह शिवसेनेचे बहुतांश पदाधिकारी व शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणावर मुळ शिवसेनेतच राहणे पसंत केले होते . अशातच काही दिवसापूर्वी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी शिवसेनेला ‘ जय महाराष्ट्र ‘ केला लवकरच ते शिन्दे गटाची कास धरणार असल्याची चर्चा आहे. अशा परिस्थितीत सक्षम नेतृत्वाअभावी पोरक्या झालेल्या यवतमाळ जिल्हा शिवसेनेला बळकटी देण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिकांचा भरणा असणाऱ्या उमरखेड विधानसभा क्षेत्रातील ज्येष्ठ शिवसैनिकाला जिल्हाप्रमुखपद़ देवुन पक्षांतर्गत होणाऱ्या गळतीला थोपविण्याची गरज असल्याची भावना उमरखेड – महागाव विधानसभेतील शिवसेना कार्यकर्त्यIकडून व्यक्त होत आहे.
यवतमाळ जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा शिवसेनेची शाखा ही उमरखेड तालूक्यात स्थापन झाली होती तेव्हापासून आजतागायत शिवसेनेचे कार्यकर्ते येथे तग धरून आहेत . जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांचे कुठलेही पाठबळ नसतांना, पक्षाच्या वतीने आयोजीत विविध आंदोलनात उमरखेड तालुक्यातील शिवसेना नेहमीच अग्रस्थानी राहिली. परंतु येथील कोणत्याही शिवसैनिकाला बळ देण्याचे काम आजपर्यंत वरिष्ठ स्थरावरुन झाले नाही . जिल्हयाच्या एका टोकाला अडगळीत असल्यासारखी अवस्था उमरखेड मधील शिवसैनिकांची राहिली आहे . वास्तविक पाहता उमरखेडसारख्या दुर्गम डोंगराळ भागात, १४० किलोमिटरचा विस्तार असणाऱ्या, ९२ ग्रामपंचायतीसह जवळपास १२५ गावांचा समावेश असणाऱ्या या तालुक्यात एखादया पक्ष संघटनेचे काम शेवटच्या माणसांपर्यंत पोहचविणे अत्यंत अवघड असतांना, अशाही परिस्थितीत तालूक्यातील जेष्ठ शिवसैनिकांनी जवळपास ८० टक्के गावामध्ये व सर्वच ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे अस्तित्व जिवंत ठेवण्याचे काम केले विशेष म्हणजे शिवसेनेच्या या अस्तित्वाची दखल शिवसेनेच्या नेतृत्वाने घेण्याऐवजी शिवसैनिकांच्या बळावर हि विधानसभा काबिज करणाऱ्या भाजपाने घेतली व थेट पक्षाचे जिल्हाध्यक्षपद उमरखेडला देवुन गेल्या ३ वर्षापासून येथील शिवसेनेच्या वर्चस्वावर कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र अद्यापही निष्ठावंत शिवसैनिकांच्या सक्रिय सहभागामुळे स्थानीक पातळीवर शिवसेना अग्रेसर आहे. परिणामी उमरखेडातील शिवसेनेचे अस्तीत्व सुरु असलेल्या सत्ता व पक्ष संघर्षात निष्ठावंत शिवसैनिकाला बळकटी मिळावी यासाठी रिक्त असणाऱ्या जिल्हाप्रमुख पदावर तालूक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकाची नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख कैलास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेकडे केली आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…