उमरखेड तालुक्यातील तलाठी कार्यालय दोन वर्षापासुन लोकार्पणाच्या प्रतीक्षेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :- तालुक्यासाठी सुमारे सात वर्षापुर्वी मंजूर झालेल्या तलाठी कार्यालयाची लोकार्पणाविना दयनीय अवस्था झाली असुन प्रशासनाला अद्याप लोकार्पणासाठी मुहूर्त सापडलेला नाही.कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या तलाठी कार्यालये व इमारती धूळ खात पडल्या आहेत. ०२ नोव्हेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग शासननिर्णय अन्वये तसेच जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांच्या १३ मार्च २०१५ रोजीच्या आदेशानुसार तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ अंतर्गत १८ तलाठी कार्यालय तथा निवासस्थान ईमारत बांधकामासाठी रुपये ३,१६,६८,३९८ संबंधित विभागाला निधी व अधिकार प्राप्त होऊन त्यामध्ये कालांतराने त्यात वाढ होऊन मंजूर तलाठी कार्यालयाची मंजूर संख्या 38 पर्यंत झालेली आहे. ०६ सप्टेंबर २०२२ रोजीची सद्यस्थिती पाहता ३८ कार्यालयापैकी ०६ कार्यालयाला अद्याप संबंधित विभाग जागाच उपलब्ध करून देऊ शकला नाही. उर्वरित ३२ कार्यालयापैकी केवळ ०६ कार्यालयाचे लोकार्पण (ताबा देण्यात आला) असुन उमरखेड शहर तसेच बंदी भागातील २६ कार्यालयाचे अद्याप लोकार्पण झालेले नसल्याकारणाने बंदी व दुर्गम भागातील गोरगरीब जनता तसेच शेतकरी वर्ग यांना तालुक्याच्या ठिकाणी वारंवार फेऱ्या घालाव्या लागत आहेत.
दोन वर्षापासुन कार्यालयाचे लोकार्पण न झाल्याने गोरगरीब जनता तसेच शेतकरी व तलाठी वर्ग यांना होणारा त्रास व गैरसोय आणि शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून संबंधित विभागाने उभ्या केलेल्या कार्यालयाच्या इमारतीची आज रोजी दुरावस्था पाहता शासनाच्या निधीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून या संदर्भात रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने सदर वास्तुचे इस्टिमेट प्रमाणे सर्व बाबींची पूर्तता करून तात्काळ लोकार्पण करण्यात यावे अशी निवेदनातून मागणी करून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज रोजी प्रशासनास देण्यात आला.
यावेळी यावेळी रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल पाटील चिंचोलकर, उपजिल्हाध्यक्ष मेजर संभाजी हापसे, शहराध्यक्ष शुद्धोधन भाऊ दिवेकर, मार्शल दिलीप मुनेश्वर, तालुका अध्यक्ष गौतम नवसागरे, उपतालुका अध्यक्ष भीमराव खंदारे, तालुका संघटक संदीप राऊत, तालुका सहसंघटक संजय चव्हाण, तीवडी शाखाअध्यक्ष बबलु भाऊ सूर्यवंशी, प्रशांत शिंगणकार व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…