अमृता फडणवीस यांना फेक अकाउंट वरुण शिवीगाळ करणाऱ्या महिलेला ठाण्यातून अटक…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना सोशल मीडियावर शिवागाळ केल्याप्रकरणी एका महिलेस अटक करण्यात आली आहे. फेक फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून ही महिला अमृता फडणवीसांना शिवीगाळ करत होती.
या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने ठाण्यातील एका महिलेला अटक केली आहे. स्मृती पांचाळ असं या महिलेचं नाव आहे. तिच्याविरोधात आयपीसी आणि आयटी कायद्यानुसार एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या महिलेने आपली ओळख लपवण्यासाठी गणेश कपूर नावाने एक बनावट फेसबुक अकाऊंट तयार केले होते. ज्य़ामाध्यमातून ती अमृता फडणवीस यांना शिवीगाळ करत होती. तसेच ती आपल्या वॉलवर अमृता फडणवीसांविरोधात अपमानास्पद पोस्ट टाकल्या होत्या. याप्रकरणी संबंधित आरोपी महिलेला 15 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप अॅटिव्ह असतात. अनेक पोस्टच्या माध्यमातून त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागत असतात. मात्र संबंधित आरोपी महिलेने अमृता फडणवीस यांच्याविरोधात अत्यंत अपमानास्पद भाषा वापरली होती. त्यामुळे पोलिसांनी एका अज्ञात फेसबुक युजरविरोधात गुन्हा दाखल केला होता. अटक केल्यानंतर ही महिला फेक अकाऊंट वापरून शिवीगाळ करत असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अद्याप तपास सुरु आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…