राज ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक ; मनसेच्या गोटात हालचालींना वेग ; मनसे-शिंदे गट एकत्र येणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबई महापालिकेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसं राजकीय घडामोडींना वेग येताना दिसत आहे. राज्यातील राजकारणात वारंवार नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत.
दोन महिन्यांपूर्वी राज्यात सत्तांतर झालं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते यांच्यातील जवळीक गेल्या काही दिवसांमध्ये वाढताना दिसत आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
दुसरीकडे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी मनसे-भाजप युतीला विरोध केला आहे. या घटनाक्रमानंतर मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनसे आणि शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यासाठीच मनसेच्या गोटात हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. मनसे नेते आणि सरचिटणीस यांच्यासोबत ठाकरे यांची बैठक होणार आहे. ही बैठक उद्या (12 सप्टेंबर) सकाळी दहा वाजता वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीची बातमी समोर आल्यानंतर अनेकांना या बैठकीबाबत उत्सुकता वाढली आहे.
या बैठकीत राज ठाकरे नेमकी काय सूचना करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बैठकीत ‘या’ मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज ठाकरे 18 सप्टेंबरपासून विदर्भ दौऱ्यावर जाणार आहेत. याशिवाय मनसे आणि शिवसेनेचा शिंदे गट एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंनी दसरा मेळावा घ्यावा, यासाठी मनसे कार्यकर्ते आग्रही आहेत. याशिवाय राज्यातील आगामी महापालिका निवडणुका तोंडावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुका आणि संघटनात्मक बांधणी या सर्व विषयांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….