बेल्ट मध्ये लपवून सुरू होती सोन्याची तस्करी ; मुंबई विमानतळावर 12 किलो गोल्ड जप्त….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई 11 सप्टेंबर :- मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुंबई सीमाशुल्क विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरुन तब्बल 12 किलो सोनं जप्त केलं आहे.
जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत जवळपास 6 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका विशेष बेल्टची आतमध्ये लपवून हे सोनं विदेशात घेऊन जाण्यात येत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सूदान येथून आलेल्या 6 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबईत विमानतळावर सध्या याबाबत चौकशी केली जात आहे. बेल्टमध्ये लपवून सोन्याची तस्करी
मुंबईत हे सोन्याचे तस्कर कोणाच्या संपर्कात होते, या बाबतची चौकशी केली जात आहे. सुदानमधून सोन्याची तस्करी कधी आणि कशी होते, याबाबतचा संपूर्ण तपास सीमाशुल्क विभाग करत आहे.
याआधी आठवडाभरापूर्वीच मुंबई विमानतळावरुन सोनं तस्करीची आणखी एक घटना समोर आली होती. यात मस्कतहून विमानानं आलेल्या एका प्रवाशानं कंबरेच्या पट्ट्यात दीड कोटींचं अडीच किलो सोनं लपवून आणलं होतं. मात्र, विमानतळावर पकडलं जाण्याच्या भीतीनं आरोपीनं शौचालयातील डस्टबिनमध्ये सोनं फेकलं. यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी त्याला बेड्या ठोकल्या होत्या. यानंतर आता पुन्हा एकदा सीमाशुल्क विभागाने मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करत 6 कोटी रुपयांचं सोनं जप्त केलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे .

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…