गद्दारी , दगाबाजी आणि स्वार्थ म्हणजे हिंदुत्व नाही उद्धव ठाकरे यांच्या भाजपावर हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाराष्ट्राला भगव्याची परंपरा आहे. ही परंपरा वारकरी मंडळी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवत असतात. आपल्या या परंपरेत, हिंदुत्वात स्वार्थ नाही; परमार्थ आहे. पण आजची परिस्थिती पाहता गद्दारी, दगाबाजी आणि स्वार्थ म्हणजे हिंदुत्व नाही हे विचार घराघरात पोहोचविण्याची वेळ आज वारकरी समाजावर आली आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजपवर निशाणा साधला.
पंढरपूर, देहू, आळंदीतील शेकडो वारकऱ्यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शविला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात वारकरी समाजाने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले. तुमचे आशीर्वाद हीच माझी सत्ता आहे. तुम्ही पाठीशी राहिलात तर जगही जिंकू शकतो, असा विश्वासही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
घराघरात जाऊन शिवसेनेच्या भगव्याचा प्रचार करू ः वारकऱ्यांची ग्वाही
वारकऱ्यांच्या हाती असलेला भगवा आणि शिवसैनिकांच्या हाती असलेला भगवा हा एकच आहे. शिवसेना कायम वारकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. मुंबईसारख्या शहरात वारकरी भवन उभे राहिले ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामुळेच. पण महाराष्ट्रात आज जे चाललेय ते कुणालाही पटणारे नाही. म्हणूनच उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. घराघरात जाऊन शिवसेनेच्या भगव्याचा प्रचार करू, अशी ग्वाही उपस्थित वारकरी मंडळींकडून यावेळी देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत, शिवसेना उपनेत्या नीलम गोऱहे, आमदार रवींद्र वायकर, अखिल वारकरी संघाचे राष्ट्रीय कीर्तनकार संघाचे अध्यक्ष ह.भ.प. मच्छींद्र महाराज पुंभारे, उपाध्यक्ष श्रीकांत धुमाळ, सचिव ह.भ.प. यशवंत महाराज फाले, प्रदेशाध्यक्ष ह.भ.प. गंभीर महाराज अवचार, सदस्य अण्णासाहेब वाल्हेकर, आत्माराम महाराज शास्त्र्ााr, आबा महाराज गव्हाणे, जेहलम जोशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील कीर्तनकार उपस्थित होते.
वारकऱ्यांच्या रूपाने पांडुरंग दिसला
वारकरी पायी वारीला जात असतात, असाच वारीचा योग माझ्या आयुष्यात आला, तो म्हणजे वारीची पह्टोग्राफी करताना. भीमातीरावर जमलेला तो वारकऱ्यांचा अथांग सागर हेलिकॉप्टरमधून दिसला. वारकऱ्यांच्या या अथांग सागराच्या रूपाने मला त्यावेळी पांडुरंगाचाच साक्षात्कार झाला होता, अशी भावना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.
हरिनामाच्या गजराने दुमदुमली ‘मातोश्री’
पंढरपूर, देहू, आळंदीहून आलेले हे वारकरी हाती विणा, टाळ, मृदंग घेऊनच ‘मातोश्री’ निवासस्थानी दाखल झाले. ‘पुंडलिक वरदा, हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा विठूनामाचा गजरच ‘मातोश्री’वर दाखल झालेल्या या वारकऱ्यांनी केला. हरिनामाच्या गजराने अवघी ‘मातोश्री’ दुमदुमली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कृष्ण हरी म्हणत या वारकऱ्यांचे स्वागत केले तेव्हा पुन्हा एकदा विठुरायाचा गजर झाला.
पंढरपुरात वारकरी भवन , वारकऱ्यांसाठी रुग्णालय व्हावे यासाठी पाठपुरावा करणार
यावेळी उपस्थित वारकऱ्यांकडून पंढपूर, देहू, आळंदी इथे वारकरी भवन व्हावे, वारकऱ्यांसाठी रुग्णालय व्हावे अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, पंढरपूरच्या वारीसाठी येणारा वारकरी हा चंद्रभागेच्या तिरावरच आपले वास्तव्य करतो. त्या काळातही गाडगे महाराज हाती खापर आणि झाडू घेऊन या परिसराची स्वच्छता कशी राहील, वारकरी रोगराईपासून दूर कसा राहील याची काळजी घेत होते. आजही तेच जनतेच्या सेवेचे विचार आमच्या मनात भिनलेत आणि हेच आमचे हिंदुत्व आहे. या वारकऱ्यांच्या डोक्यावर छप्पर असावे हा विचार आजपर्यंत कुणालाच सुचला नाही याचे आश्चर्य आहे; पण पंढरपुरात वारकऱ्यांसाठी वारकरी भवन आणि त्यांच्या आरोग्यासाठी रुग्णालय उभारण्यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…