मुंबई विसर्जन मिरवणुकीत ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील दोन वर्षानंतर यंदा राज्यात मोठ्या उत्साहत गणेशोत्सव साजरा करण्यात आला, दह दिवसांनंर राज्यभरात काल गणरायाला निरोप देण्यात आला. यादरम्यान प्रभादेवी परिसरातील सार्वजनिक मिरवणूकीत ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आल्याने तणाव निर्माण झाला होता.
गणेश विसर्जन मिरवणूकीत शिवसेना आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळासाठी गोंधळाचे वातावरण तयार झाले होते. समाधान सरवणकर यांच्याकडून म्याव म्याव अशा घोषणाबाजी करण्यात आल्यानंतर वातावरण तापले, यानंतर दोन्ही गटात तुफाण घोषणाबाजी झाली.
मिरवणूकीच्या वेळी शिंदे आणि ठाकरे गटाचे स्टेज हे आमने सामने होते. संजय भगत आणि समाधान सरवणकर यांचे कार्यकर्ते हे समोरासमोर आले होते, दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकत्र आल्याने तणाव वाढला. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.
शिंदे गटाच्या प्रियाताई सरवणकर या घटनास्थळी उपस्थित होत्या त्यांनी प्रभादेवी येथे कोणताही अनुचित प्रकार घडलेला नसून सर्वकाही शांततेत असल्याचे तसेच मोठ्या उत्साहात बाप्पाला निरोप दिला जात असल्याचे माध्यमांना बोलताना सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकाराबद्दल प्रतिक्रिया देत, परिस्थीतीची माहिती घेतली असून पोलिसांनी योग्य ती काळजी घेतली असल्याचे सांगितले.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…