संजय राऊत यांच्या जामिनीसाठी सुनील राऊत धावले ; मातोश्री वरून थेट दिल्लीला….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- 1 ऑगस्ट रोजी 2022 रोजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ईडीने अटक केली होती. राऊत यांच्या विक्रोळी येथील निवास्थानी ईडीने धाड टाकली तेव्हा तब्बल साडे नऊ तास चौकशी आणि ईडीच्या कार्यालयात सात तासांहून अधिक काळ संजय राऊत यांची चौकशी झाली.
तब्बल 15 तांसाहून अधिक काळ ईडीकडून संजय राऊतांची चौकशी सुरु होती. यानंतर अखेरीस 1 ऑगस्ट रोजी साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केली. त्यानंतर अनेक वेळा जामीन अर्ज केला. मात्र, त्यावर दिलास न मिळाल्याने आता राऊतांचे भाऊ सुनील राऊत यांनी धाव घेतली आहे.
सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली….
सुनील राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांना चुकीच्या पद्धतीने तुरुंगात टाकण्यात आलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख असले तरी ते आता माझ्या राऊत कुटुंबाचे देखील प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी मला भेटालया बोलावलं होतं, त्यांनी कुटुंबाची विचारपूस केली असं सुनील राऊत यांनी सांगीतलं आहे.
मातोश्रीवरुन थेट दिल्लीलाः
दरम्यान, सजंय राऊत यांच्या जामिनासाठी अर्ज केलेला असून मला खात्री आहे की संजय राऊत यांच्यावर कुठलाही गुन्हा नसल्याने त्यांना लवकरात लवकर जामीन मिळेल असा विश्वास सुनील राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. यानंतर आता ते थेट दिल्लीला पोहचले आहेत. वरिष्ठ वकिलांसोबत चर्चा करण्यासाठी सुनील राऊत दिल्लीत पोहोचले आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…