शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी ; उद्याच घटनापीठाची स्थापना होणार…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली, 06 सप्टेंबर :- शिवसेना आणि शिंदे गटामध्ये सुरू असलेला न्यायालयीन लढा आता निर्णयक टप्प्यावर आला आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर उद्या बुधवारी घटनापीठाची स्थापना केली जाईल असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.
त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर आता सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई दौऱ्यानंतर आता शिंदे गट आक्रमक झाला आहे. शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली आहे. शिंदे गटाकडून सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करण्यात आली होती.
केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवावी, निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देऊ नये, अशी मागणी शिंदे गटाने सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे. तसंच, सुप्रीम कोर्टानं त्वरीत सुनावणी घ्यावी आणि निवडणूक आयोग प्रक्रीये संदर्भात निर्णय द्यावा, अशी विनंतीही शिंदे गटाने केली आहे. त्यानंतर आता सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह मिळवण्यासाठी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती दिली होती. या वादावर 5 न्यायाधीशांचे खंडपीठ स्थापन केले आहे. या प्रकरणावर सुनावणी कधी होणार आहे, याबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
मुंबईमधील अंधेरी पूर्व भागामध्ये विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे इथं निवडणूक होत आहे. शिवसेनेकडून रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिंदे गटानेही या ठिकाणी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पक्षचिन्ह काय असणार असा प्रश्न शिंदे गटासमोर उपस्थितीत झाला आहे. त्यामुळे शिंदे गटाने आता सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीमध्ये काय निर्णय होईल, हे पाहण्याचे ठरणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…