भाजपाला जागा दाखवू ; शिवसेनेचे अमित शाह यांना प्रत्युत्तर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे शिवसेनेने धोका दिल्याचा कांगावा करत असले तरी कोणी कोणाला धोका दिला हे संपूर्ण देशाने पाहिले आहे. शिवसेना कायमच जमिनीवर होती.
भाजपच सध्या हवेत असून लवकरच त्यांना त्यांची जागा दाखवू, असे उत्तर शिवसेनेने अमित शहा यांना दिले आहे.
मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाच्या मेळाव्यात संवाद साधताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याला धोका दिल्याने आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला भुईसपाट करा. त्याला शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक उत्तर दिले. करोना काळात उद्धव ठाकरे यांनी लोकांना कशी मदत केली हे जनतेला माहिती आहे. परंतु यांची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये करोनाकाळात गंगेत मृतदेह वाहून गेल्याचे संपूर्ण देशाने पाहिले आहे. भाजपच्या घोषणांना मुंबईचा नागरिक भूलणार नाही. दिल्ली आणि पंजाबप्रमाणे महाराष्ट्रातदेखील भाजप भुईसपाट होईल. आधी गर्जना केल्यानंतर युती करण्यासाठी ‘मातोश्री’वर आला होता हे विसरू नका, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते अरविंद सावंत यांनी लगावला.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेने सर्वप्रथम १५० ची घोषणा दिली. अमित शहा हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी १५० ची घोषणा देणे ही शिवसेनेची शुद्ध नक्कल आहे. धोका कोणी कोणाला दिला हे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सर्वजण पाहात आहेत. मुंबईकरांना तुमचे धोके आणि खोकेही नको आहेत. शिवसेना जमिनीवरच आहे. आम्हाला काय जमीन दाखवणार. तुम्ही हवेत आहात, आम्ही तुम्हाला जमिनीवर आणू. लवकरच भाजपला त्यांची जागा दाखवू असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला.
अमित शहांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही. कोण कोणाला धडा शिकवेल हे दिसेलच. शिवसेना व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना जितका त्रास दिला जात आहे तितकेच ते अधिक जोमाने वर येत आहेत. लोकांच्या नजरेत त्यांचे स्थान वाढत आहे. भाजपचा डाव यशस्वी होणार नाही, अशी टीका शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केली.
‘फुटीर आमदारांनी भाष्य करावे’
शिवसेनेला धोका देणाऱ्या ४० जणांनी भाष्य करावे. अमित शाह यांच्या विधानावर मी काही भाष्य करणार नाही. पण शिवसेनेचे जे ४० आमदार आम्हाला सोडून गेले आहेत त्यांनी यावर भाष्य करावे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी दिली.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…