शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर मराठा सेवा संघाची खेळी ; संघटनेत मोठा बदल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- शिवसेना – संभाजी ब्रिगेड युतीची राज्यभरात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षांनी या नव्या युती आणि समीकरणावर टीका केली आहे. शिवसेनेची संभाजी ब्रिगेडसोबतची युती किती यशस्वी होते, हे येणारा काळच ठरवणार आहे.
दरम्यान, युतीनंतर फेरबदल करण्यात आले आहेत.
शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीनंतर फेरबदल करण्यात आहे. २०२४ च्या निवडणुकीचे लक्ष्य समोर ठेवून मराठा सेवा संघाने नवी रणनीती आखली आहे. मराठा सेवा संघाची जबाबदारी आता तरुन कर्मचाऱ्यांकडे देण्यात आली आहे. केवळ ३० टक्के जुने पदाधिकारी पदावर ठेवण्यात आले आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने संभाजी ब्रिगेडशी झालेली युती निश्चितच राज्याच्या राजकारणाला वळण देणारी ठरेल. एकीकडे राज्यात शिवसेनेला खिंडार पडलेले असतानाच शिवसेना व संभाजी ब्रिगेड हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये त्याचा दोन्ही पक्षांना फायदा होईल, अशी प्रतिक्रिया दोन्ही पक्षात उमटली आहे.
महाराष्ट्राचे हित जोपासण्यासाठी संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेने एकत्र वाटचाल करण्याचे ठरवले आहे. या देशात क्रांतीची गरज आहे. लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे. त्यामुळे पुरोगामी संघटनांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठीच शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड भविष्यात सर्व निवडणुका एकत्र लढवेल, असे संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…