लोकसभा निवडणूक एकत्रित लढवणे शक्य :- शरद पवारांनी दिले संकेत….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आगामी 2024 मधील लोकसभा निवडणूक किमान समान कार्यक्रमाच्या आधारे लढण्याचा विचार केला जाऊ शकतो,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
त्यामुळे पुढील निवडणूका महाविकास आघाडी म्हणून लढवली जाण्याची शक्यता आता बळावली आहे.

‘आागामी निवडणूक एकत्रित लढण्याबाबत विचार केला जाऊ शकतो.’ ईडी, सीबीआय यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग केला जात आहे. या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका करत पवार म्हणाले की, ‘भाजपाने नवा कार्यक्रम हाती घेतला आहे. पैसा, ईडी आणि सीबीआय यांच्या बळावर सरकारे पाडली जात आहेत.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकात जे घडले, तसाच प्रयोग झारखंडमध्येही सध्या केला जात आहे. भाजपच्या या प्रयत्नांना तोंड कसे द्यायचे हे आपल्याला ठरवावे लागेल. विरोधकांनी एकजूट झाले पाहिजे असंही ते पुढे म्हणालेत.
भाजपसोबतची युती सोडून राष्ट्रीय जनता दलाबरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल पवार यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच कौतुक केलं आहे. नितीश आमचे जुने सहकारी आहेत आणि त्यांनी योग्य राजकीय निर्णय घेतला, असंही पवार म्हणालेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…