उद्धव ठाकरेंनी टाकला डाव ; संतोष बांगर यांच्या समोर उभं केलं कडवं आव्हान ; माजी काँग्रेस आमदार करणार शिवसेनेत प्रवेश….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिंगोली 29 ऑगस्ट :- हिंगोलीतील कळमनुरी विधानसभेचे काँग्रेसचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे आणि शेतकरी नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अजित मगर हे आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते पक्षात प्रवेश करतील. आज दुपारी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे दोन्ही नेते शिवबंधन बांधणार आहेत.
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर हिंगोलीत राजकीय उलथापालथ होत आहे.
विधानसभा निवडणुकीत आमदार संतोष बांगर यांचे प्रतिस्पर्धी राहिलेले वंचित बहुजन आघाडीचे अजित मगर आणि काँग्रेसचे कळमनुरीचे माजी आमदार डॉ. संतोष टारफे हे आता शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आमदार संतोष बांगर यांना शिवसेनेनं कळमनुरी मतदारसंघात कडवं आव्हान निर्माण करण्यासाठी चांगलीच व्यूहरचना रचली आहे. सोमवारी म्हणजेच आज डॉ.टारफे आणि अजित मगर हे दोघे दुपारी साडेबारा वाजता मातोश्रीवर पोहोचणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याशी त्यांची चर्चा होणार आहे.
पक्ष प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर निर्णय घेऊ असे टारफे म्हणाले आहेत.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देत शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता शिवसेनेनं याठिकाणी आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केलेली दिसत आहे. उद्धव ठाकरे आता संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करत आहेत.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…