पंकजा मुंडेचा पुन्हा पत्ता कट..? ; राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतून माहिती समोर….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई, 29 ऑगस्ट :- महाविकास आघाडी सरकारच्या काळात रखडलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी लवकरच मार्गी लागणार आहे. शिंदे सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी तयार केली जात आहे.
मात्र, या यादीमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव नसल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलले जाण्याची शक्यता आहे. शिंदे आणि भाजप सरकार स्थापन झाले आहे. सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या निर्णयाला स्थगिती देण्याचा धडाका लावला आहे.
मविआ सरकारने पाठवलेली राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी अद्यापही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे प्रलंबित आहे. आता ही यादी नव्याने तयार केली जात आहे. मात्र, ही यादी जाहीर होण्याआधीच राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांच्याबद्दल नवीन माहिती उघड केली आहे.
गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे यांच्या पुण्याईने भाजप पक्ष वाढला आहे.
ज्या पद्धतीने तिकीट द्यायचं आणि सुडाचं राजकारण करून त्यांच्याच मुलीचा पराभव केला. रोहिणी खडसेंना हे लक्षात आलं. आता माझ्या पंकजा मुंडे यांच्याही लवकर लक्षात यायला पाहिजे. कारण, 12 आमदारांची यादी आहे, ती यादी राज्यपाल लवकरच मान्य करतील.
मुळात राज्यपालच भाजपचे आहे. पण मला असं समजलं की दुर्दैवाने 12 आमदारांच्या यादीत पंकजा मुंडेंचं नाव नाही. त्यामुळे आपला पक्ष प्रामाणिकपणे वाढवणाऱ्यांचे पंख कसे छाटतात दिसते आहे. रोहिणी खडसे यांना पुढचं भविष्य लवकर कळलं, त्यांनी लगेच राष्ट्रवादीत प्रवेश केला.
आता पंकजा ताईंना सुद्धा याची जाणीव असावी किंवा असेल, त्यामुळे त्यांनी पाऊल उचलावी, असा सल्लाच मिटकरी यांनी पंकजा मुंडे यांना दिला आहे.
शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी चर्चा रंगली होती. पण, खातेवाटपामध्ये पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नाही. खुद्द पंकजा मुंडे यांनीच सरकार स्थापन करण्यामध्ये आपले योगदान हे खारीचे सुद्धा नाही, असं म्हणत भूमिका स्पष्ट केली होती. त्याआधी विधान परिषद निवडणुकीमध्येही पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नव्हती. आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीतही पंकजा मुंडेंचे नाव वगळण्यात येईल की संधी दिली जाईल हे पाहण्याचे ठरणार आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…