“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच” ; जयंत पाटलांचा दावा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्याच्या राजकारणाबाबत भाकित वर्वतलं आहे. मध्यावधी निवडणुका लागल्यास राष्ट्रवादी काँग्रेस निवडणुकीसाठी किती तयार आहे, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी उत्तर दिलं.
“सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिंदे सरकार पडणारच!”, असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. आता मध्यावधी निवडणुका होतील की नाही हे माहित नाही पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार पडणार आणि मग मध्यावधी निवडणुका लागतील. जर मध्यावधी निवडणुका लागल्या तर आम्ही सगळेजण निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.
मध्यावधी निवडणुका लागतील का? असा प्रश्न काही दिवसांआधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना विचारण्यात आला होता. तेव्हा सरकार पडेल आणि निवडणुका लागतील हे सांगायला मी ज्योतिषी नाही. निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. नाही लागल्या तरी विरोधी पक्ष म्हणून आम्ही आमची जबाबदारी पार पाडणार आहोत, असं शरद पवार म्हणाले होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….