आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट होणार ; “या” मुद्द्यावर चर्चा होणार…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर, 27 ऑगस्ट :- महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर झाल्यापासून युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे प्रचंड आक्रमक झालेले बघायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांवर प्रचंड टीका करताना दिसत आहेत.
एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने बंडखोरी केल्याने शिवसेनेला मोठं खिंडार पडलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय. पण आज थोडीशी वेगळी बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे पुढच्या आठवड्यात भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहेत.
त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. पण आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीमागील कारण महत्त्वाचं आहे. एका संवेदनशील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे फडणवीसांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज नागपूर जिल्ह्यात राखेचा तलाव असलेल्या नांदगाव येथे भेट दिली आणि तेथील पीडित गावकऱ्यांची समस्या ऐकून घेतल्या.
त्यावेळी त्यांनी कार्यक्रमात बोलताना आपण या प्रकरणी गावकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी पुढच्या आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती दिली.
आदित्य ठाकरे गावकऱ्यांना काय म्हणाले? “शहरात राहत असल्यामुळे बटन दाबले की लाईट माहिती असतं. पण त्यामुळे इथे गावात आयुष्याची राख होते हे माहिती नव्हते. मी नांदगावला आलो आणि लोकांचे आयुष्य कसे या राखेच्या आजूबाजूला फिरते ते पाहिलं.
राख काढायला सुरुवात केली हा आनंदाचा क्षण आहे. आपण 60 ते 65 टक्के राख काढली. आपण रोजगार ट्रेनिंग सुरू केले. पण आता सरकार बदललं आहे.
पण मी तुमच्या बरोबरच आहे. हे सांगायला आलो आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले. “हे राजकारण नाही. ही राजकारण्यांसाठी लाजेची गोष्ट आहे की लोक असे राहतात. 10 वर्ष झाले जमीन घेऊन पण तरी काम सुरू झाले नव्हते. आम्ही DUMPING बंद केले आहे. आता हे सरकार काय करत हे मला माहिती नाही, पण मी तुमच्यासोबत आहे”, असंदेखील आदित्य ठाकरे म्हणाले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….