गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर राहुल गांधींची खोचक आणि तिखट प्रतिक्रिया , म्हणाले…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज सर्व पदांसह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
काँग्रेसमधील नाराजांच्या जी-२३ मधील प्रमुख सदस्य असलेले गुलाम नबी आझाद हे गेल्या काही काळापासून पक्षात नाराज होते. दरम्यान, आज पक्ष सोडताना त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर घणाघाती टीका केली होती. आता राहुल गांधी यांनी गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यावर अगदी खोचक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. जे घाबरले ते आझाद आहेत, असा टोला राहुल गांधी यांन लगावला आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देताना पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रामधून गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर घणाघाती टीका करत काही गंभीर आरोप केले होते. ते म्हणाले की, काँग्रेसने इच्छाशक्ती आणि क्षमता दोन्हीही गमावले आहेत. भारत जोडो यात्रा सुरू करण्यापूर्वी काँग्रेस नेतृत्वाने देशभरात काँग्रेस जोडो अभियान सुरू केले पाहिजे.
यावेळी गुलाम नबी आझाद यांनी राहुल गांधींवरही टीका करत आरोपांची फैर झाडली होती. ते म्हणाले की, जेव्हापासून राहुल गांधींचा राजकारणात प्रवेश झाला आहे आणि २०१३ मध्ये त्यांची काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून त्यांनी काँग्रेसमध्ये आधीपासून असलेल्या जुन्या सल्लागार तंत्राला नष्ट केले. तसेच सर्व ज्येष्ठ आणि अनुभवी लोकांना बाजूला केले. सध्या राहुल गांधी हे अननुभवी लोकांच्या कोंडाळ्यात घेरले गेलेले आहेत. काँग्रेसमध्ये सोनिया गांधी केवळ नाममात्र आहेत. सर्व महत्त्वपूर्ण निर्णय राहुल गांधींकडूनच घेतले जात होते. यापेक्षा वाईत शब्दांत सांगायचं तर त्यांचे सुरक्षा कर्मचारी आणि खासगी सचिव निर्णय घेत होते, असा गंभीर आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला होता.

ठेवीदारांच्या हितासाठी आम्ही कटीबद्ध :- शरद मैंद….
“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”