कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण शुल्क माफ :- चंद्रकांत पाटलांची घोषणा…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकंचे निधन झाले आहे अशा विद्यार्थ्यांना पदवी आणि पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ होणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
“कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना या महत्त्वपूर्ण घोषणेमुळे फार मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

“चालू अभ्यासक्रमातील उर्वरित वर्षांचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आले आहे. यामध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी दरवर्षी वेगळी घोषणा करण्याची आवश्यकता नाही, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.

कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांनी आपले पालक गमावले आहे. अशा अनेक अनाथ मुला-मुलींना शिक्षण घेता यावे यासाठी सरकारने संपूर्ण शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या महत्वपूर्ण निर्णयामुळे दोन्ही पालक गमावलेल्या पदवी आणि पदविका शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंतची फी सरकार भरणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. आज विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….